Ind vs SA 3rd ODI Match: आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संजू सॅमसनचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक

Ind vs SA 3rd ODI Match: आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संजू सॅमसनचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक

भारताचा सोशल मीडियावर सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटपटू संजू सॅमसनने अखेर आठ वर्षाचा आपला दुष्काळ संपवला आहे.
Published by :
Team Lokshahi

Sanju Samson: भारताचा सोशल मीडियावर सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटपटू संजू सॅमसनने अखेर आठ वर्षाचा आपला दुष्काळ संपवला आहे. त्याने तब्बल 40 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर शतकी खेळी केली आहे. 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या संजूला आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकी खेळीसाठी तब्बल 8 वर्षे वाट पहावी लागली आहे.

यासह केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं आफ्रिकेला त्याच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत 2-1 नं पराभूत केलं. या सामन्याचा हिरो संजू सॅमसन होता, त्यानं शानदार खेळी करत शतक झळकावलं. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला लक्ष्याचा पाठलाग करूच दिला नाही. या विजयासह टीम इंडियानं इतिहास रचला.

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय वनडे सीरिजमधील हा दुसरा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियानं आफ्रिकेत 8 द्विपक्षीय वनडे सीरिज खेळली होती, त्यापैकी फक्त एकच मालिका जिंकली होती. तिने 2018 मध्ये एकमेव मालिका जिंकली होती. आता 9 पैकी दुसरी मालिका जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने दोन खेळाडूंबरोबर महत्वाची भागीदारी रचली. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर संजूने केएल राहुलसोबत 52 धावांची भागीदारी रचत संघाला सावरलं. राहुल 21 धावा करून बाद झाल्यानंतर त्याने तिलक वर्माच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला.

Ind vs SA 3rd ODI Match: आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संजू सॅमसनचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक
Tuljabhawani Temple: तुळजाभवानीचा चांदीचा मुकूटही गहाळ

तिलक वर्मासोबत संजूने 116 धावांची शतकी भागीदारी रचली. तिलकची सुरूवात संथ झाली होती. मात्र त्याने नंतर आक्रमक फलंदाजी करत 77 चेंडूत 52 धावा केल्या. 246 धावा झाल्या असताना संजू बाद झाला. त्यानंतर रिंकू सिंह आणि वॉशिंग्टन सुंदरने भारताला 277 धावांपर्यंत पोहचवले. सुंदर 14 धावा करून बाद झाल्यानंतर रिंकूने भारताला 300 जवळपास पोहचवले. त्याने 27 चेंडूत 38 धावा केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com