IPL 2024 MI VS SRH: मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव! सनरायझर्स हैदराबादने 31 धावंनी केला पराभव

IPL 2024 MI VS SRH: मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव! सनरायझर्स हैदराबादने 31 धावंनी केला पराभव

आयपीएल 2024 च्या 8व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला.
Published by :
Dhanshree Shintre

Indian Premier League 2024: आयपीएल 2024 च्या 8व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे ज्यात अनेक विक्रम झाले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने तीन विकेट गमावून 377 धावांचा डोंगर उभारून बुधवारी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली.

हैदराबाद संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. तसेच पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 246 धावा केले. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत तिसरे तर मुंबई सलग दोन सामने गमावून नवव्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. आयपीएल 2024 अंतर्गत खेळल्या गेलेल्या या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. दोन्ही डावात एकूण 69 चौकार मारले गेले. याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यातही तेवढ्याच चौकार मारण्यात आले होते. हा सामना 2010 साली चेन्नईत खेळला गेला होता.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात हार्दिक पंड्याच्या संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी हैदराबादपेक्षा एका डावात जास्त षटकार मारण्याचा विक्रम या संघाने केला. वास्तविक, हैदराबादच्या डावात एकूण 18 षटकार मारले गेले तर मुंबईच्या फलंदाजांनी 20 षटकार मारले. या बाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव आघाडीवर आहे, ज्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 21 षटकार ठोकले होते. या सामन्यात सर्वाधिक षटकार आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात एकूण 38 षटकार मारले गेले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com