Shreyas Iyer
Shreyas Iyer

"कुणालाच माझ्यावर विश्वास नव्हता..."; BCCI च्या सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टसंबंधीत प्रकरणावर श्रेयस अय्यरचं मोठं विधान

भारतीय नियामक मंडळाने त्यांच्या सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाहेर काढलं. अय्यरने फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने न खेळल्याने बीसीसीआयने त्याचा सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला नाही.
Published by :

Shreyas Iyer On His Back Injury : भारतीय नियामक मंडळाने त्यांच्या सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाहेर काढलं. अय्यरने फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने न खेळल्याने बीसीसीआयने त्याचा सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला नाही. परंतु, श्रेयस अय्यरने याबाबत मोठा खुलासा केला आहे. अय्यरने त्याच्या पाठीच्या दुखापतीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने मोठा खुलासा करत म्हटलं की, तो वनडे वर्ल्डकपनंतर पाठीच्या दुखापतीमुळं त्रस्त आहे. याच कारणामुळे त्याने मोठ्या फॉर्मेटचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, कुणालाही त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

वर्ल्डकपनंतर मी खूप संघर्ष करत होतो. मी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली, पण कुणीही माझ्याशी सहमत झाला नाही. माझी स्वत:शीच स्पर्धा होती. जेव्हा आयपीएलला सुरुवात होणार होती, त्यावेळी मला चांगली कामगिरी करण्यावर फोकस करायचं होतं. आम्हाला मैदानात आमच्या योजना आणि रणनिती योग्य पद्धतीने आखायच्या होत्या. आम्ही असं काही केलं, तर चांगल्या स्थितीत राहू, याबाबत आम्हाला माहित होतं आणि तसंच काहीसं घडलं.

गतवर्षी झालेल्या दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने एशिया कपमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यानंतर २०२४ च्या सुरुवातीला इंग्लंडविरोधात झालेल्या घरेलू टेस्ट सीरिजमध्ये पहिल्या दोन सामन्यांसाठी अय्यरची निवड करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित तीन सामन्यांसाठी त्याची निवड झाली नाही. अय्यरला पाठीची दुखापत झाली असल्याचं त्यावेळी समोर आलं. परंतु, त्यानंतरही त्याची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफी सामने खेळले नाहीत. तो नॉकआऊट सामने खेळण्यासाठी आला होता. परंतु, तोपर्यंत बीसीसीआयने अय्यरला सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com