Shubman Gill
SHUBMAN GILL LIKELY TO LEAD INDIA AHEAD OF NEW ZEALAND ODI SERIES

Shubman Gill: वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी, दोन सामन्यांतून मिळणार मोठी संधी

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिलकडे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा उद्या ३ जानेवारीला होईल. शुबमन गिल दुखापतीतून सावरून कमबॅक करणार असून, त्याच्याकडेच कर्णधारपदाची धुरा सोपवली जाणार आहे. दुखापतीमुळे तो वनडे मालिकेत खेळला नव्हता, तर टी२० मालिकेतही शेवटचे दोन सामने चुकवले. यामुळे टी२० वर्ल्डकपचे स्वप्न भंगलेचे.

मालिकेपूर्वी शुबमन गिल विजय हजारे ट्रॉफीत पंजाबकडून सलग दोन सामने खेळणार आहे. पंजाबचा पहिला सामना ३ जानेवारीला सिक्किमविरुद्ध आणि दुसरा ६ जानेवारीला गोव्याविरुद्ध होईल. टी२० मालिकेतील पायाच्या दुखापतीतून सावरताना तो पंजाबसोबत सराव करत आहे. हे सामने त्याला लय परत मिळवण्यास मदत करतील, तर ७ जानेवारीनंतर तो टीम इंडियासोबत न्यूझीलंड मालिकेसाठी रवाना होईल.

याशिवाय, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही या सामन्यांत खेळण्याची शक्यता आहे. अर्शदीपची वनडे मालिकेत निवड होईल की आराम दिला जाईल, हे पाहणे रोचक ठरेल. तो टी२० मालिका आणि वर्ल्डकपचा भाग असल्याने वनडे संघात स्थान मिळवण्याची चर्चा आहे.

Summary
  • भारत-न्यूझीलंड वनडे मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

  • शुबमन गिल दुखापतीतून सावरून कमबॅक करत असून कर्णधारपदाची शक्यता आहे.

  • विजय हजारे ट्रॉफीत पंजाबकडून तो सलग दोन सामने खेळणार आहे.

  • अर्शदीप सिंगच्या वनडे संघातील निवडीवरही चर्चा सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com