IPL 2024 Final Match
IPL 2024 Final Match

IPL 2024 Final : सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतला निर्णय, KKR गोलंदाजीसाठी सज्ज, 'अशी' आहे प्लेईंग ११

आयपीएल २०२४ चा फायनलचा महामुकाबला कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे.
Published by :

SRH vs KKR Playing 11 : आयपीएल २०२४ चा फायनलचा महामुकाबला कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. लाखो क्रीडाप्रेमींची हा सामना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशातच सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करत असून कोलकाता नाईट रायडर्सची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे.

'अशी' आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११

कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरेन, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसल, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षीत राणा

KKR चे इम्पॅक्ट प्लेयर्स : नितीष राणा, अनुकूल रॉय, मनीष पांडे, के एस भरत, शेरफेन रदरफोर्ड

सनरायजर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, ट्रेविस हेड, नितीश कुमार रेड्डी, अॅडम मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, टी नटराजन

SRH चे इम्पॅक्ट प्लेयर्स : ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, वॉशिंगटन सुंदर, अब्दुल समद, उमरान मलिक

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com