Sunil Chhetri : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीनं खास अंदाजात चाहत्यांना दिली गुड न्यूज; मैदानातच केलं...

Sunil Chhetri : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीनं खास अंदाजात चाहत्यांना दिली गुड न्यूज; मैदानातच केलं...

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यानं त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यानं त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेदरम्यानच्या सामन्यात त्याने ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.

हा सामना वानुआतू आणि भारत यांच्यात झाला. हा सामना भारताने 1-0 असा जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर छेत्रीने आनंद साजरा करत पत्नीच्या गरोदरपणाची घोषणा केली.

या व्हिडिओमध्ये सुनील छेत्रीनं आपल्या टी-शर्टमध्ये फुटबॉल ठेवला आणि पत्नी गरोदर असल्याचे हावभाव केले. छेत्रीची पत्नीही टाळ्या वाजवत हसत होती. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com