MI vs SRH, IPL 2024
MI vs SRH, IPL 2024

IPL 2024: हैदराबादच्या फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, सर्वाधिक २७७ धावा करुन रचला इतिहास, पाहा VIDEO

ट्रेविस हेडने २४ चेंडूत ६२, अभिषेक शर्माने २३ चेंडूत ६३ तर हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत ८० धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.
Published by :

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ८ वा थरारक सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला. हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये धावांचा पाऊस पाडला. ट्रेविस हेडने २४ चेंडूत ६२, अभिषेक शर्माने २३ चेंडूत ६३ तर हेनरिक क्लासेनने ३४ चेंडूत ८० धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तसंच एडन मार्करमनेही २८ चेंडूत ४२ धावा कुटल्या. या धावांच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत ३ विकेट्स गमावून २७७ धावांचा डोंगर रचला आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला.

मुंबईचे गोलंदाज क्वेना मफाकाने ४ षटकांत १६.५० च्या इकॉनोमीनं ६६ धावा दिल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने ११.५० च्या इकोनॉमीनं ४ षटकांत ४६ धावा देत एक विकेट घेतली. गेराल्ड कोएट्जीचाही एसआरएचच्या फलंदाजांनी समाचार घेतला.

गेराल्डने ४ षटकांत १४.२० च्या इकॉनॉमीनं ५७ धावा देत एक विकेट घेतली. तर मुंबईचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने ४ षटकात ३६ धावा दिल्या. तर फिरकीपटू पीयुष चावलाने २ षटकात ३४ धावा देत १ विकेट घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com