Sandeep lamichhane
Sandeep lamichhane

T20 World Cup 2024: अमेरिकेनं संदिप लामिछानेला व्हिसा नाकारला; नेपाळमध्ये USA विरोधात तीव्र आंदोलन

टी-२० वर्ल्डकपचे बहुतांश सामने अमेरिकेत होणार आहेत. अशातच यूएस एम्बेसीनं नेपाळ संघाचा स्टार खेळाडू संदिप लामिछानेला टी-२० वर्ल्डकपसाठी व्हिसा नाकारला आहे.
Published by :

Sandeep lamichhane Latest News Update : टी-२० वर्ल्डकपचे बहुतांश सामने अमेरिकेत होणार आहेत. अशातच यूएस एम्बेसीनं नेपाळ संघाचा स्टार खेळाडू संदिप लामिछानेला टी-२० वर्ल्डकपसाठी व्हिसा नाकारला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली निर्दोष मुक्तता झालेल्या संदिपची आता टी-२० वर्ल्डकप खेळण्याची आशा मावळली आहे. युएसएनं व्हिसा नाकारल्यानं नेपाळचे नागरिक अमेरिकेविरोधात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहेत.

टी-२० वर्ल्डकपआधीच नेपाळच्या न्यायालयाने संदिप लामिछानेची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर संदिप लामिछानेवर लावलेली बंदी हटवण्यात आली होती. त्यानंतर संदिपला टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी नेपालच्या संघात सामील केलं होतं. परंतु, युएस एम्बेसीनं संदिपला व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे नेपाळच्या युवकांनी अमेरिकेविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. क्रिकेट असोशिएशन ऑफ नेपालने संदिप लामिछानेला व्हिसा मिळण्याबाबत आशा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही आतापर्यंत फक्त १४ खेळाडूंची लिस्ट आयसीसीला पाठवली आहे. कारण आम्हाला अजूनही आशा आहे की, संदिप लामिछानेला यूएस एम्बेसीकडून व्हिसा दिला जाईल. आयसीसीने संदिप लामिछानेला वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये सामील करण्याबाबत आधीच परवानगी दिली आहे. जर लामिछानेला व्हिसा मिळाला, तर त्याला टी-२० वर्ल्डकप टीममध्ये सामील केलं जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com