T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकपपूर्वी मोठा निर्णय; भारत-ऑस्ट्रेलियानंतर तिसऱ्या संघाची घोषणा, रोहित बनला कर्णधार
भारत-श्रीलंकेकडे संयुक्त यजमानपद असलेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होणार आहे. २० संघ सहभागी असलेल्या या स्पर्धेसाठी नेपाळने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी आणि तरुण खेळाडूंची सांगड घालणाऱ्या या संघाची धुरा रोहित पौडेलकडे सोपवण्यात आली आहे. उपकर्णधार दीपेंद्र सिंह ऐरी असून, फिरकी विभागात संदीप लामिछानेला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रोहित पौडेल हा अनुभवी फलंदाज असून, नेपाळला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले आहेत. संदीप लामिछाने फिरकीचा आधारस्तंभ ठरेल, तर ललित राजबंशी आणि बसीर अहमद यांचाही समावेश आहे. अष्टपैलू म्हणून दीपेंद्रसह गुलशन झा, आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांना संघात स्थान मिळाले आहे. संपूर्ण संघ: रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंह ऐरी (उपकर्णधार), संदीप लामिछाने, कुशल भुरटेल, आसिफ शेख, संदीप जोरा, आरिफ शेख, बशीर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजबंशी, शेर मल्ला आणि लोकेश बाम.
नेपाळ सी ग्रुपमध्ये आहे, ज्यात बांग्लादेश, इंग्लंड, इटली आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. साखळी फेरीत चार सामने खेळणाऱ्या नेपाळचा पहिला मुकाबला ८ फेब्रुवारीला इंग्लंडशी, १२ फेब्रुवारीला इटलीशी, १५ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजशी आणि १७ फेब्रुवारीला बांग्लादेशशी होईल.
चांगली कामगिरी केल्यास सुपर ८ फेरीत स्थान मिळेल. भारताने मागच्या महिन्यात संघ जाहीर केला असून, एकापाठोपाठ एक संघांची घोषणा होतेय. नेपाळसाठी ही स्पर्धा मोठी संधी आहे. अनुभवी लामिछाने आणि पौडेल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
