Team India
Team India

Team India : भारतीय संघ अडचणीत! आयसीसीने घेतली कडक कारवाई, एक छोटी चूक पडली महागात

Cricket News: रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने वेळेत 50 ओव्हर्स न टाकल्यामुळे आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी दंडात्मक कारवाई केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

टीम इंडियाने शनिवार, 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने प्रशंसनीय विजय नोंदवला. भारताने 271 धावांचे आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण करत मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. केएल राहुल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. मात्र, 3 डिसेंबरला रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला 358 धावा करतही 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघाने एक मोठी चूक केली होती, ज्यामुळे आता आयसीसीने टीम इंडियावर कारवाई केली आहे.

Team India
Virat Kohli Dance: कोहलीची धम्माल! क्रिकेट मैदानावरही थिरकला कोहली, विशाखापट्टणममध्ये लाईव्ह मॅच दरम्यान केले कपल डान्स

रायपूरमधील सामन्यात टीम इंडियाला निर्धारित वेळेत 50 ओव्हर पूर्ण करण्यात अडचण आली. नियमानुसार 50 ओव्हर वेळेत न टाकल्यामुळे आयसीसीने टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटसाठी दंडात्मक कारवाई केली आहे. आयसीसीने ट्विटरच्या एक्स प्लॅटफॉर्मवरून याबाबतची माहिती दिली. सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी या प्रकरणी टीम इंडियावर दंड ठोठावला आहे. भारताने निर्धारित वेळेतली 2 ओव्हर लवकर न टाकल्यामुळे संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दोषी ठरले आहेत. आयसीसीच्या आचार संहितेच्या अनुच्छेद 2.22 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Team India
Smriti Mandhana & Palash Muchhal: स्मृती मानधना–पलाश मुच्छल नात्यात पूर्णविराम; लग्न रद्द, सोशल मीडियावरूनही अनफॉलो

आयसीसीच्या नियमांनुसार, 1 ओव्हर कमी टाकल्यास मानधनाचा 5 टक्के दंड ठोठावला जातो, मात्र टीम इंडियाने 2 ओव्हर वेळेत कमी टाकल्यामुळे 10 टक्के मानधनाची रक्कम दंड म्हणून द्यावी लागली. कॅप्टन केएल राहुल यांनी या आरोपांना मान्यता दिली असून दंड स्वीकारल्यामुळे सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

टीम इंडियाने मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात ओव्हर रेट कायम ठेवण्यात अपयश पत्करले आहे. यापूर्वी रांचीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही टीम इंडियाने वेळेत खेळाचे ओव्हर पूर्ण करण्यात अडचण दाखवली होती. त्यामुळे भारतीय चाहत्यांना आगामी टी20 मालिकेत संघाकडून या चुका टाळण्याचे मोठे आवाहन आहे.

Summary
  • रायपूर सामन्यात टीम इंडियाकडून दोन ओव्हर वेळेत टाकण्यात त्रुटी.

  • आयसीसीने आचारसंहितेतील अनुच्छेद 2.22 अंतर्गत दंड ठोठावला.

  • खेळाडूंना एकूण 10% मानधनाचा दंड.

  • केएल राहुल यांनी आरोप स्वीकारल्याने सुनावणीची गरज भासली नाही.

  • मालिकेत सलग दुसऱ्यांदा ओव्हर रेट राखण्यात अयशस्वी.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com