Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

T20 World Cup 2024: रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर 'या' अष्टपैलू खेळाडूनं घेतली टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघानं १७ वर्षानंतर आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या टूर्नामेंटमध्ये जेतेपद पटकावलं.
Published by :
Naresh Shende
Published on

Ravindra Jadeja Announce Retirement From T20 Cricket : भारतीय क्रिकेट संघानं १७ वर्षानंतर आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या टूर्नामेंटमध्ये जेतेपद पटकावलं. भारतानं वर्ल्डकप जिंकताच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं माध्यमांशी बोलताना टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचं घोषित केलं. त्यानंतर आज भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. बारबाडोसमध्ये शनिवारी झालेल्या फायनलच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रविंद्र जडेजानं म्हटलं, माझ्या मनात हृदयस्पर्षी भावना आहेत. मी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. पळणाऱ्या प्रामाणिक घोड्याप्रमाणे मी देशासाठी सर्वोच्च योगदान दिलं आहे आणि इतर फॉर्मेटमध्येही ते पुढे नेईल. वर्ल्डकप जिंकल्यानं स्वप्नांची पूर्तता झाल्याचा अनुभव आला. हे माझ्या टी-२० क्रिकेटच्या करिअरमधील उंच शिखर आहे. तुम्ही दिलेल्या आठवणी आणि अमुल्य सहकार्याबद्दल सर्वांचं आभार मानतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com