Team India: विधिमंडळाच्या आवारात उद्या टीम इंडियाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान

29 जून रोजी वेस्ट इंडिजमध्ये आजोयित करण्यात आलेल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडिया आपल्या देशात परतली आहे.
Published by :
Team Lokshahi

29 जून रोजी वेस्ट इंडिजमध्ये आजोयित करण्यात आलेल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडिया आपल्या देशात परतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळला गेलेला फायनलचा सामना अटितटिचा होता, मात्र भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला, पण बेरील वादळामुळे त्यांना घरी परतण्यास उशीर झाला. मात्र आज टीम इंडियाचे आपल्या मायदेशात आगमन झालं आहे, त्यांच्या स्वागतासाठी चाहते मोठ्या उत्साहाने भारतीय खेळाडूंच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

तर मुंबईत खुल्या बसमध्ये संध्याकाळच्या वेळेस मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत चाहत्यांना खेळाडूंची झलक पाहायला मिळणार आहे. दुपारी 4 वाजता टीम इंडिया ही दिल्लीतून मुंबईत येणार आहे. यासाठी मुंबईत टीम इंडियाच्या स्वागताची मोठ्या जल्लोषात तयारी करण्यात आली आहे. तसेच स्वागतादरम्यान सुरक्षेची देखील काळजी घेतली जाणार आहे. तर टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर झालेले पाहायला मिळत आहे. ओपनडेक बसमधून मिरवणूक निघणार असून यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याच पार्श्वभुमीवर विधिमंडळाच्या आवारात उद्या टीम इंडियाचा कप्तान आणि मुंबई सहभागी असलेले क्रिकेटपटू येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा उद्या सन्मान होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com