Team India Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले की, टीम इंडियाचं मुंबईत मनापासून स्वागत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रेकॉर्ड केला आहे. तब्बल 17 वर्षानंतर भारताने हा विश्वचषक जिंकला आहे.
Published by :
Team Lokshahi

प्रत्येक क्रिकेटप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. भारतीय खेळाडूंचे स्वागत मोठ्या जल्लोषात होत आहे. प्रत्येक मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तर टीम इंडिया ही आता वानखेडे स्टेडिअमवर रवाना झाली आहे. तिथे देखील चाहते प्रत्येक खेळाडूच्या नावाचा जयजयकार करताना दिसत आहेत.

या पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले की, टीम इंडियाचं मुंबईत मनापासून स्वागत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रेकॉर्ड केला आहे. तब्बल 17 वर्षानंतर भारताने हा विश्वचषक जिंकला आहे. तर मुंबईकर मोठ्या उत्साहाने टीम इंडियाचे स्वागत करत आहेत. त्याचसोबत नागरिकांना अशी विनंती आहे की, गर्दी मोठी आहे. उत्साह देखील आहे, सर्वांनी आपली काळजी घ्यावी.

तर याचसोबत मी पोलिसांशी चर्चा केली होती. यावर पोलिसांनी तयारी देखील केली आहे. विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच मी पोलिसांच्या संपर्कात आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com