Team India Victory Parade : टीम इंडिया मरिन लाईनवर दाखल, ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूकीला सुरूवात

भारतीय खेळाडूंच्या स्वागताला आणि विजयोत्सवाला आता सुरुवात झालेली दिसत आहे. मरीन ड्राईव्ह येथून भारतीय खेळाडू चॅम्पियन ट्ऱॉफी उचलवत चाहत्यांना खुश करत आहेत.
Published by :
Team Lokshahi

भारतीय खेळाडूंच्या स्वागताला आणि विजयोत्सवाला आता सुरुवात झालेली दिसत आहे. मुंबईमध्ये आज टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक काढली जात आहे. मरीन ड्राईव्ह येथून भारतीय खेळाडू चॅम्पियन ट्ऱॉफी उचलवत चाहत्यांना खुश करत आहेत. प्रत्येक क्रिकेटप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे.

मिरवणूक आता सुरु झाली असून विजयाचे हे सेलिब्रेशन आता पाहायला मिळत आहे. भारतीय खेळाडूसुद्धा ही सगळी दृश्य आपल्या फोनमध्ये कैद करत आहेत. मुंबईकरांच्या प्रेमाने प्रत्येक खेळाडू भारावून गेलेला दिसत आहे. मरीन ड्राईव्ह, नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडिअम अशी ही रॅली काढली जात आहे. चॅम्पियन्सची ही बस तगड्या पोलीस बंदोबस्तासह वानखेडे स्टेडियमजवळ रवाना होत आहे. अखेर टीम इंडियाचे पाच दिवसांनी मायदेशात आगमन झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com