India vs Zimbabwe 3rd T-20 Update
India vs ZimbabweGoogle

भारताची विजयी घौडदौड सुरुच! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; तिसऱ्या सामन्यातही झिम्बाब्वेचा दारुण पराभव

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतानं झिम्बाब्वेविरोधात सुरु असलेल्या मालिकेत दमदार वापसी केली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

India vs Zimbabwe 3rd T-20 : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतानं झिम्बाब्वेविरोधात सुरु असलेल्या मालिकेत दमदार वापसी केली आहे. भारताने सलग दोन समान्यांमध्ये झिम्बाब्वेचा पराभव करून २-१ नं आघाडी घेतली आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तिसरा टी-२० सामना रंगला. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांमध्ये ४ विकेट्स गमावून १८२ धावा केल्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. झिम्बाब्वेच्या संघानं २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून १५९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

भारतासाठी सलामीला उतरलेल्या यशस्वी जैस्वालने (३७), शुबमन गिलने (६६) धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ४९ धावांची खेळी केली. या सामन्यात अभिषेक शर्माला धावांचा सूर गवसला नाही. शर्मा १० धावा करून माघारी परतला. संजू सॅमसन १२, तर रिंकू सिंग १ धाव करून नाबाद राहिला.

तसच भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने अप्रतिम कामगिरी करत ३ विकेट्स घेतल्या. आवेश खानने २ विकेट घेतल्या, तर खलील अहमदला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. झिम्बाब्वेसाठी डीऑन मेयर्सने सर्वाधिक ६५ धावांची नाबाद खेळी केली. झिम्बाब्वेसाठी मुझराबानी आणि सिकंदर रझाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com