IND VS SA 2nd Test: जगातील सर्वात छोट्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय

IND VS SA 2nd Test: जगातील सर्वात छोट्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय

केपटाऊन कसोटीत भारताने दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्स राखून पराभव केला.
Published by :
Team Lokshahi

केपटाऊन कसोटीत भारताने दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्स राखून पराभव केला. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर भारताचा हा पहिला कसोटी विजय आहे. यासह दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. भारताला दुसऱ्या डावात 79 धावांचे लक्ष्य मिळाले. संघाने 3 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.

बुधवारी न्यूलँड्सच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत सर्वबाद झाला होता, तर भारतालाही पहिल्या डावात केवळ 153 धावा करता आल्या होत्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 98 धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 176 धावा केल्या. अखेरच्या डावात संघ ७८ धावांनी पुढे होता, त्यामुळे भारताला ७९ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने 12व्या षटकात हे लक्ष्य गाठले.

पाच दिवसाचा कसोटी सामना दीड दिवसात संपवण्याची कामगिरी टीम इंडियाने केली आहे. या सर्वात छोट्या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ तर दुसऱ्या डावात जसप्रित बुमराहने ६ विकेट्स पटकावून विजय मिळवला. सामन्यामध्ये जसप्रित बुमराहने एकूण ८ तर सिराजने ७ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एडम मारक्रमने अपेशी झुंज देत शानदार १०६ धावांची खेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com