IND vs BAN: ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द; चाहत्यांची निराशा
ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या दिवसाचा 35 षटकांचा खेळ संपल्यानंतर दुसरा दिवस पावसाने पूर्णपणे वाहून गेला. रविवारी तिसऱ्या दिवशी पाऊस पडला नाही पण मैदान ओले झाल्याने आजचा खेळही एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
मैदान ओले असल्याने आज पुन्हा खेळ सुरू होण्यास विलंब झाले आहे. सध्या तेथे पाऊस नाही, पण खेळपट्टी कव्हरने झाकली गेली आहे. आजही पावसाची 59 टक्के शक्यता आहे. मैदान ओले असल्याने खेळ सुरू होण्यास विलंब करण्यात आले आहे. सकाळी 10:00 वाजता पंच मैदानाची पाहणी करण्यात आली. सुपर आणि ग्राउंड स्टाफ मैदान कोरडे करण्यात व्यस्त आहेत.
आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. बांगलादेशने पहिल्या डावात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावरही परिणाम झाला. मात्र दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. दरम्यान, ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.