BCCI Awards: 'हा' खेळाडू ठरला 2023 चा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू

BCCI Awards: 'हा' खेळाडू ठरला 2023 चा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू

BCCI दरवर्षी पुरस्कार देते ज्यामध्ये वर्षभर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला जातो.
Published by :
Team Lokshahi

BCCI दरवर्षी पुरस्कार देते ज्यामध्ये वर्षभर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला जातो. मागील वर्षात गिलची दमदार कामगिरी लक्षात घेऊन बीसीसीआयने त्याची वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली. कोविडमुळे BCCI ला गेली तीन वर्षे हा पुरस्कार कोणला देता नव्हता, मात्र यंदा बोर्डाने तीन वर्षांचे मिळून हे पुरस्कार दिले आहेत. बीसीसीआयने या भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलला विशेष पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी हैदराबाद येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात गिलचा गौरव केला जाणार आहे. मोहम्मद शमीला 2019-20 साठी, रविचंद्रन अश्विन 2020-21 साठी आणि जसप्रीत बुमराह 2021-22 साठी हा पुरस्कार देण्यात आला.

सलामीवीर शुभमन गिल हा गेल्या वर्षभरापासून प्रत्येक फोरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारा खेळाडू बनला आहे. तसेच त्याने वनडेत वर्षभरात पाच शतके झळकावली आहेत. यात एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याच्या या दमदार कामगिरीमुळेच त्याचा सन्मान केला जाणार आहे. हे दोन्ही पुरस्कार 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये दिले जाणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. BCCI चा हा पुरस्कार सोहळा Jio सिनेमावर प्रसारित केले जाणार आहे.

बीसीसीआयने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि कर्णधार रवी शास्त्री यांना लाइफ टाईम अचिव्हमेंट देण्याचा निर्णय घेतलाय. शास्त्री प्रशिक्षक असताना टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली होती. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातृभूमीत पराभूत केलं होतं. कसोटी मालिकेत सलग दोनदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला लावली होती.

तसेच परदेशात टीम इंडियाने दमदार कामिगिरी केली होती. शास्त्रींच्या कार्यकाळात टीम इंडियाने वर्ल्डकप 2019 ची उपांत्य फेरी गाठली होती. यापूर्वी 2014 मध्ये शास्त्री संघाचे संचालक बनले होते. दरम्यान शास्त्री यांनी भारतासाठी 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने खेळलेत. 1981 ते 1992 पर्यंत ते भारताकडून क्रिकेट खेळले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com