बाप रे..! भारत- पाकिस्तान 'या' हाय व्होल्टेज सामन्याची तिकीटं काही तासातच संपली; वाचा नक्की काय घडलं?

बाप रे..! भारत- पाकिस्तान 'या' हाय व्होल्टेज सामन्याची तिकीटं काही तासातच संपली; वाचा नक्की काय घडलं?

आशिया कपनंतर विश्वचषकात भारत पुन्हा पाकिस्तान समोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे हा सामना पाहण्याची देखील चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Published by :
Sagar Pradhan

मुंबई : आशिया चषकाला आजपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान 2 सप्टेंबर रोजी भारत वि. पाकिस्तान हा सामना पार पडणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या क्रिकेटृप्रेमींसाठी याच दिवशी आशिया कपची सुरूवात होणार आहे. हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पाठोपाठ विश्वचषकात होणाऱ्या भारत वि. पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लागून असताना थेट मैदानातून सामना पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीय. भारत- पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याची तिकिटे काही क्षणातच संपले आहे.

विशेष म्हणजे भारत या वर्षी दोनदा पाकिस्तानशी भिडणार आहे. आशिया कपनंतर विश्वचषकात भारत पुन्हा पाकिस्तान समोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे हा सामना पाहण्याची देखील चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, या सामन्याची तिकिटांच्या बुकिंगसाठी आयीसीसीने बुकिंग भागादारी असलेल्या ‘BookMyShow’ ने विशेषे प्री-सेल विंडो ओपन केल्यानंतर तासाभरात सर्व तिकीट संपली. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले आहे.

आशिया कपसाठी संघ

भारत -

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव)

पाकिस्तान-

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, तय्यब ताहिर (राखीव).

आशिया कप वेळापत्रक:

30 ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - मुलतान

31 ऑगस्ट: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - कॅंडी

2 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान - कॅंडी

३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - लाहोर

4 सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ - कॅंडी

५ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - लाहोर

सुपर-4 स्टेज शेड्यूल

६ सप्टेंबर: A1 Vs B2 - लाहोर

९ सप्टेंबर: B1 वि B2 - कोलंबो (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असू शकते)

10 सप्टेंबर: A1 वि A2 - कोलंबो (भारत विरुद्ध पाकिस्तान असू शकते)

12 सप्टेंबर: A2 वि B1 - कोलंबो

14 सप्टेंबर: A1 विरुद्ध B1 - कोलंबो

15 सप्टेंबर: A2 विरुद्ध B2 - कोलंबो

17 सप्टेंबर: अंतिम - कोलंबो

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com