cristiano ronaldo Team Lokshahi
क्रीडा
Video पराभव होताच ढसाढसा रडला रोनाल्डो, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
जिथे मोरोक्कोनं स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ पोर्तुगालचा 1-0 असा पराभव केला. या पराभवामुळं रोनाल्डोचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.
सध्या कतार देशामध्ये अनेक वादासह फुटबॉल विश्वचषक सुरु आहे. परंतु, या स्पर्धेत आता उलेटफेर पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्येही अशाच काही गोष्टी पाहायला मिळाल्या, जिथे मोरोक्कोनं स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ पोर्तुगालचा 1-0 असा पराभव केला. या पराभवामुळं रोनाल्डोचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. कारण हा विश्वचषक त्याचे शेवटचे विश्वचषक होते. त्यामुळे रोनाल्डो प्रचंड चर्चेत आला आहे. मात्र, मैदानातून बाहेर येताच रोनाल्डो ढसाढसा रडायला लागला त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या अनेक निराशाजनक प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.