Virat Kohli Century
VIRAT KOHLI CENTURY IND VS NZ INDORE ODI RECORD-BREAKING PERFORMANCE 2026

IND vs NZ : इंदूरच्या मैदानावर विराट कोहलीचा थरारक शतक, जागतिक रेकॉर्ड मोडला, दोन दिग्गजांना मागे टाकलं

Virat Kohli Century: विराट कोहलीने इंदूरच्या होलकर स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक शतक ठोकले. ९१ चेंड्यांत ८ चौकार, २ षटकारांसह हे शतक भारताला मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर नेते.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात चिवट शतक ठोकून संघाला विजयाच्या दिशेने मजबूत आधार दिला आहे. इंदौरच्या होलकर स्टेडियममध्ये ३३८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत सापडला असताना विराटने ९१ चेंड्यांत २ षटकार आणि ८ चौकारांसह हे झुंजार शतक साकारले, जे ४०व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंड्यावर १ धाव घेऊन पूर्ण झाले.

मालिका १-१ ने बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक ठरला असून, विराटच्या या खेळामुळे भारत मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.विराटचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील ५४ वे, न्यूझीलंडविरुद्ध सातवे आणि एकूण आंतरराष्ट्रीय ८५ वे शतक ठरले असून, २०२६ मधील त्याचे पहिले शतक आहे.

पहिल्या वनडे सामन्यात ११ जानेवारीला अवघ्या ७ धावांनी ९३ वर हुकलेल्या संधीची चूक इंदौरमध्ये सुधारत विराट नववर्षात वनडिशिवाय शतक करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला, कारण के.एल. राहुलने दुसऱ्या वनडे सामन्यात ही कामगिरी केली होती. या शतकाने विराटने पुन्हा एकदा दबावाखालील क्षमता दाखवली असून, आता गोलंदाजांच्या कामगिरीवर भारताच्या मालिका विजयाचे भवितव्य अवलंबून आहे.

Summary
  • विराट कोहलीने इंदूरमध्ये ९१ चेंड्यांत निर्णायक शतक ठोकले.

  • भारत-न्यूझीलंड ODI मालिका १-१ ने बरोबरीत होती.

  • शतकामुळे भारताला मालिका जिंकण्याची संधी वाढली.

  • विराटच्या खेळामुळे दोन दिग्गजांना मागे टाकून जागतिक विक्रम निर्माण झाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com