विरेंद्र सेहवागने केले फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला ट्रोल

विरेंद्र सेहवागने केले फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला ट्रोल

Published by :

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. अनेकांनी मीम शेअर करत फेसबुक आणि इन्साग्रामची येथेच्च ट्रोलींग केली. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील यानंतर कू अॅपवर पोस्ट टाकून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर निशाणा साधला.

अशी पोस्ट कू अॅपवर करत त्यांने लोकांना माहौल बनण्यास सांगितले तर नंतर त्यांने व्हॉटसअॅप फॅमीली ग्रुपवर पोस्ट गुड नाईटचा मॅसेज नाही आल्यावर असा मीम शेअर केला.दरम्यान फेसबुकने कॉन्फिगरेशनमध्ये झालेल्या चुकीच्या बदलांमुळे सेवा ठप्प होती अशी माहिती दिली आहे. डेटा सेंटर्सशी नेटवर्क ट्राफिकचं समन्वय साधणाऱ्या राऊटर्समध्ये झालेल्या चुकीच्या बदलांमुळेच सेवा सहा तास ठप्प होती असा फेसबुकचा दावा आहे. मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. असे म्हणत त्यांनी वापरकर्त्यांची त्यांना झालेल्या त्रासासाठी माफी देखील मागितली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com