Wankhede Stadium : वानखेडे स्टेडिअम चाहत्यांनी खचाखच भरला

टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडिअम चाहत्यांनी खचाखच भरला आहे. टीम इंडियाचे कौतुक करण्यासाठी चाहत्यांनी मरिन ड्राईव्हवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडिअम चाहत्यांनी खचाखच भरला आहे. टीम इंडियाचे कौतुक करण्यासाठी चाहत्यांनी मरिन ड्राईव्हवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. वानखेडे स्टेडिअममध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा जयघोष होताना दिसत आहे. 29 जूनला झालेल्या वेस्ट इंडिजमधल्या सामन्याने भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले.

मुंबईकर आता भारतीय खेळाडूंचे मोठ्या जल्लोषात स्वागत करायला सज्ज झाले आहेत. कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचा गजर हा वानखेडे स्टेडिअममध्ये ऐकायला मिळत आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकर रस्त्यावर येऊन आपल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com