WPL 2023: महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात
Admin

WPL 2023: महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात

महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होत आहे. महिलांची प्रीमियर लीग ४ ते २६ मार्च या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम व नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम या दोनच ठिकाणी या स्पर्धेतील लढती होणार आहेत.

मुंबई इंडियन्स- गुजरात जायंटस् यांच्यामध्ये आज लढत होणार आहे. या स्पर्धेत एकूण २१ सामने खेळले जातील. यामध्ये एकूण पाच संघ आणि ८७ खेळाडूंचा समावेश आहे. यामधील १५ वर्षांहून अधिक वयाच्या खेळाडूंना जगातील दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये होतील.

शनिवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला  अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला सायंकाळी ५.३० वा. सुरुवात होईल.

मुंबई इंडियन्स महिला : हरमनप्रीत कौर (कर्णधार) , नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, यस्तिका भाटिया, अमेलिया केर, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, प्रियंका बाला, धारा गुजर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिमी बिश्त, सायका इशाक, सोनम यादव.

गुजरात जायंट्स महिला: बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा (उपकर्णधार), अॅशले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, किम गर्थ, शब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर , सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com