भारताला मोठा धक्का! कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

भारताला मोठा धक्का! कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

एशियन गेम्सशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही. हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नवी दिल्ली : एशियन गेम्सशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही. विनेश फोगट 13 ऑगस्ट रोजी जखमी झाली होती. या दुखापतीमुळे विनेश फोगट आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळू शकणार नाही. याबाबतची माहिती तिने स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे. हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विनेश फोगट म्हणाली की, गुडघ्याच्या दुखापतीमुळे 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर असल्याचे लिहिले आहे. यासोबतच १७ ऑगस्टला गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचेही तिने सांगितले. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, माझ्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. ही शस्त्रक्रिया 17 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. मात्र, आशियाई स्पर्धेतून विनेश फोगटला वगळणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चाहत्यांना विनेश फोगटकडून पदकाची अपेक्षा होती, मात्र आता ती या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची बातमी समोर आली आहे.

दरम्यान, भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते, जे मी 2018 मध्ये जकार्ता येथे जिंकले होते. यावेळी दुखापतीमुळे माझ्या आशांना मोठा धक्का बसला आहे. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवता यावे, यासाठी मी माझे म्हणणे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे, असेही विनेश फोगटने म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com