T20 Cricket Latest Update
IND vs ZIM Twitter

झिम्बाब्वेसमोर टीम इंडियानं नांगी टाकली! १०२ धावांवर भारताचा आख्खा संघ गारद, पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेचा दणदणीत विजय

झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांमध्ये ९ विकेट्स गमावून ११५ धावा केल्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजांची झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली.
Published by :
Naresh Shende
Published on

ZIM vs IND First T20 Match : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरु झाली असून हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये पहिला सामना रंगला. या सामन्यात झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांमध्ये ९ विकेट्स गमावून ११५ धावा केल्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजांची झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. भारताचा संपूर्ण संघ १९.५ षटकात अवघ्या १०२ धावांवर गारद झाल्यानं झिम्बाब्वेनं टी-२० मालिकेतील पहिला सामना खिशात घातला. झिम्बाब्वेनं १३ धावांनी विजय मिळवून भारताचा दारूण पराभव केला.

भारतीय संघात पदार्पण करणार अभिषेक शर्मा शुबमन गिलसोबत सलामीला उतरला होता. परंतु, ब्रायन बेनेटच्या गोलंदाजीवर शर्मा शून्य धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर शुबमन गिलने भारताची कमान सांभाळली. मात्र सिकंदर रझाने गिलचा ३१ धावांवर असताना त्रिफळा उडवला. त्यानंतर भारताचे सर्व खेळाडू स्वस्तात माघारी परतले.

ऋतुराज गायकवाड (७), रियान पराग (२), रिंकू सिंग (0), ध्रुव जुरेल (६), वॉशिंग्टन सुंदर (२७), रवी बिष्णोई (९), आवेश खान (१६), मुकेश कुमार (0), खलील अहमदही शून्यावर बाद झाला. टीम इंडिया धावांसाठी संघर्ष करत असताना वॉश्गिंटन सुंदरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात यश आलं नाही. सुंदरने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली, पण २७ धावांवर असताना तो बाद झाला.

झिम्बाब्वेसाठी गोलंदाज ब्रायन बेनेट, वेलिंग्टन, मुझाराबानी आणि ल्यूक जेंगवेनं प्रत्येकी एक विकेट घेतली. तर तेंदाई चटारा आणि सिंकदर रजाने प्रत्येकी ३ विकेट घेऊन झिम्बाब्वेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर भारतासाठी मुकेश कुमार आणि आवेश खानने एक विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदरने २ विकेट घेतल्या. तर रवी बिष्णोईनं भेदक गोलंदाजी करून ४ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com