शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन; आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांनी अचानकपणे आंदोलन करण्यास सूरूवात केली आहे. परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत आहेत.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जातील असा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाच्या विरोधात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पावित्रा घेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांने आंदोलन छेडले आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आहेत.
कोरोना महामारीमुळे शाळा, कॉलेज ऑनलाईन सूरू होती. मात्र परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. त्यामुळे शाळा, कॉलेज ऑनलाईन घेण्यात आली आहे तर परीक्षा ऑफलाईन का ? असा सवाल आंदोलक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.विद्यार्थी आक्रमक असून परिक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करत आहे. दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत आहे.