ओडिशा राज्यात अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी अग्नी प्रकारातील अत्याधुनिक अग्नी प्राईम या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता १००० ते २००० किमी पर्यंतची आहे. भारताने या दोन्ही देशांवर एकप्रकारे सामरिक आघाडी घेतली आहे. ओडिशा राज्यातील बलासोर येथील डॉ एपीजे अब्दुल कलाम आयलँड वरून सकाळी १०.५५ मिनिटांनी ही चाचणी करण्यात आली. अग्नी प्राईम हे कॅनिस्टर बेस क्षेपणास्त्र असून ते शत्रूच्या रडार यंत्रणा तसेच उपग्रहांना चकऊन ट्रक, रेल्वे या सारख्या प्रक्षेपक यंत्रणेवरून डागता येऊ शकते.
अग्नी १ हे क्षेपणास्त्र विकसित करून बराच अवधी लोटला होता. यामुळे या क्षेपणास्त्राच्या आधुनिकीकरणाची गरज डी.आर.डी.ओ. तसेच भारतीय सैन्य दलाने व्यक्त केली होती. त्यानुसार अग्नि प्राईम या नव्या क्षेपणास्त्राच्या विकासाचा कार्यक्रम डीआरडीओने हाती घेतला होता.