Sudhir Mungantiwar Ballarpur Assembly constituency : महायुती व महाविकास आघाडीत लढत

Sudhir Mungantiwar Ballarpur Assembly constituency : महायुती व महाविकास आघाडीत लढत

सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर मतदारसंघात विकासात्मक कामांची यशस्वी पूर्तता. ओबीसीबहुल मतदारसंघात मुनगंटीवार यांचा विजय आणि आगामी निवडणुकीतील आव्हाने.
Published on

चंद्रपूर जिल्हा

उमेदवाराचं नाव - सुधीर मुनगंटीवार

मतदारसंघ - बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर)

उमेदवाराची माहिती - (विभाग) - विदर्भ

पक्षाचं नाव - भाजप

समोर कोणाचं आव्हान : प्रतिस्पर्धी उमेदवार अजून ठरलेला नाही

उमेदवाराची कितवी लढत - 7

2019 मधील आकडेवारी -82002 ( विजयी)

मतदारसंघातील आव्हानं

ओबीसीबहुल मतदारसंघ असून, मुनगंटीवार हे अल्पसंख्यांक आहेत. बहुसंख्य मतांची विभागणी 2019 मध्ये झाल्याने मुनगंटीवार विजयी झाले होते. यावेळी पुन्हा एकदा ओबीसी कार्ड विरोधक खेळण्याची शक्यता.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स

विकासात्मक अनेक कामे मतदारसंघात झाली. सुसज्ज नगरपंचायत भवन, आयटीआय इमारत, अटल बिहारी वाजपेयी उद्यान, सिमेंट रस्ते, SNDT कॉलेज, विद्यापीठाचे उपकेंद्र, बोटानिकल गार्डन, नाट्यगृह, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वन अकादमी इत्यादी महत्वाची कामे त्यांनी केली. सुशिक्षित, उत्तम वक्ता आणि राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक. अभ्यासू नेता म्हणून ओळख.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com