Uttar Maharashtra
BHR पतसंस्था घोटाळ्यातील आरोपी सुनील झंवरला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा
जळगावातील (jalgaon)बहुचर्चित असलेले बीएचआर (BHR) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला दिल्ली येथील सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court ) मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांपुर्वी आरोपी सुनील झंवर याला पतसंस्था घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आले होती. संपुर्ण राज्यात हे प्रकरण चर्चेचे ठरले होते.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत तब्बल 61 कोटी 90 लाख 88 हजार 163 रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आले. या प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 20 ऑगस्ट 2021 रोजी सुनील झंवर याला नाशिक (Nashik) येथून अटक केली होती.गेल्या सहा महिन्यापासून कारागृहात असलेल्या बी एच आर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला सुप्रीम कोर्टाकडून आज जामीन मंजूर झाला आहे.

