जीप ‘कंपास’ फेसलिफ्ट भारतात लाँच

जीप ‘कंपास’ फेसलिफ्ट भारतात लाँच

Published by :
Published on

FCA India कंपनीने आपली '2021 Jeep Compass Facelift' भारतात लाँच केली आहे.

खास वैशिष्ट्ये :

  • जीप कंपास फेसलिफ्टला भारतात 2.0 लीटर डिझेल इंजिन आणि 1.4 टर्बो पेट्रोल इंजिन सोबत लाँच केले आहे.या कारचे इंजिन अनुक्रमे 173 एची आणि 163 एचपी पॉवर जनरेट करते.
  • पेट्रोल इंजिन 7 स्पीड ड्यूल क्लच ऑटोमॅटिक आणि डिझेल इंजिन 9 स्पीड टॉर्क कनवर्टरसोबत येणार आहे.
  • भारतात या कारची टक्कर ह्युंदाई टकसन आणि स्कोडा कॅराकशी होणार आहे.
  • या कारला कंपनीने 4 व्हेरियंट्समध्ये लाँच केले असून यामध्ये स्पोर्ट्स, लॉन्गिट्यूड (O), लिमिटेड (O) आणि टॉप मॉडल S व्हेरियंट्सचा समावेश आहे.
  • कारच्या इंटिरियरमध्ये नवीन स्टियरिंग व्हील आणि फुल डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे.
  • याशिवाय कंपनीने कंपास ट्रेलहॉक मध्ये नवीन फ्रंट बंपर आणि अलॉय व्हील्जचा वापर केला आहे.

दरम्यान, जीप कंपास फेसलिफ्टची किंमत 16.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर या कारच्या टॉप मॉडलची किंमत 24.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com