AI Mobile Launch: पहिला 'AI फोन' लाँच! डिस्प्लेला स्पर्श न करता काम करतील फीचर्स, वाचा A To Z माहिती
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या(AI) क्षेत्रात नवीन क्रांती घडवणारा "एआय फोन" लाँच करण्यात आला आहे. ज्याने तंत्रज्ञान प्रेमींमध्ये उत्सुकता आणि चिंता दोन्ही वाढवली आहे. टिकटॉकच्या मुळ कंपनी बाईटडान्सने या नवीन स्मार्टफोनचा नमुना सादर केला असून तो फक्त साध्या चॅटिंगपुरता मर्यादित नसून यूजर्सच्या मोबाइल स्क्रीनवर देखील पाहू आणि नियंत्रण करू शकतो. या यंत्रणेने यूजर्ससाठी अॅप्स उघडणे, ऑर्डर देणे आणि इतर कामे मानवी स्पर्शाविना हाताळणे शक्य होते.
बाईटडान्सचा डुबाओ एआय एजंट यूजर्सच्या आवाजावर आधारित काम करत असून तो कॉल करणे, मेसेज पाठवणे आणि तिकिटे बुक करणे यांसारखे अनेक क्रियाकलाप करताना दिसतो. हा स्मार्टफोन विज्ञानकथासारखा प्रगत असून तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी एक वेगळाच टप्पा आहे. शेंझेन येथील व्यावसायिक टेलर ओगन यांनी एआय फोन वापरताना दाखवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून त्याने यंत्रणांच्या वापराच्या मर्यादा आणि सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू केली आहे.
अद्याप या फोनला व्यावसायिकरित्या बाजारात कधी आणले जाईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु बाईटडान्स त्यांच्या उत्पादनाच्या वैशिष्ट्यांमध्ये काही बदल करणार आहेत जेणेकरून संवेदनशील डेटाची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. हा फोन ZTE च्या नुबिया ब्रँडमध्ये कस्टमाइज्ड अँड्रॉइडवर चालतो, ज्यामध्ये बाईटडान्सची इन-हाऊस लार्ज लँग्वेज मॉडेल प्रणाली डौबाओ समाविष्ट आहे.
ही नवीन एआय प्रणाली पारंपारिक व्हॉइस असिस्टंटपेक्षा वेगळी असून सिरी, अलेक्सा किंवा गुगल असिस्टंटपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करते. पारंपारिक व्हॉइस असिस्टंट फक्त एखाद्या कमांडवरून अॅप्स सक्रिय करतो, पण एआय फोन यूजर्सच्या व्हॉइस कमांडवर माणसासारखी कामे करतो आणि फोनची संपूर्ण नियंत्रणक्षमता प्राप्त करतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या या नव्या टप्प्याने युजर्सच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाईटडान्सने पहिला टचलेस एआय फोन सादर केला.
डुबाओ एआय सिस्टम कॉल, मेसेज आणि अॅप्स हात न लावता नियंत्रित करते.
ZTE नुबिया ब्रँडवर कस्टम अँड्रॉइडसह फोन कार्यान्वित.
पारंपारिक व्हॉइस सहाय्यकांपेक्षा अधिक मानवीकृत आणि प्रगत अनुभव प्रदान करतो.
