Aanand Mahindra
Aanand MahindraTeam Lokshahi

Aanand Mahindra : गणित शिक्षकाने बनवली सोलर कार, आनंद महिंद्रा टि्वट करत म्हणाले...

आनंद महिंद्रा ट्विटर अँक्टीव्ह असतात. त्यांनी टि्वट केलेल्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होतात. त्यांनी नुकतेच केलेले टि्वट चर्चेत आले आहे. एका गणित शिक्षकांने सोलर कार बनवल्याचा हा व्हिडिओ आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) ट्विटर अँक्टीव्ह असतात. त्यांनी टि्वट केलेल्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होतात. त्यांनी नुकतेच केलेले टि्वट चर्चेत आले आहे. एका गणित शिक्षकांने सोलर कार बनवल्याचा हा व्हिडिओ आहे.

श्रीनगरमधील गणिताचे शिक्षक बिलाल अहमद यांनी एकट्याने सौरऊर्जेवर चालणारी कार बनवली आहे. इलेक्ट्रॉनिक कार मार्केटमध्ये त्यांचे नावीन्यपूर्ण पाऊल आहे. या व्हिडिओमध्ये बिलाल आपली कार चालवताना दिसत आहे. कारचे दरवाजे, खिडक्या, बोनेट आणि ट्रंकवर सोलर पॅनल्स दिसतात. यानंतर बिलाल या कारचे गुण सांगताना दिसत आहे.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आणि पद्म पुरस्कार विजेते आनंद महिंद्रा यांनी बिलालचे कौतूक केले आहे. बिलालने एकट्याने ही कार विकसित केल्याबद्दल मी त्याचे कौतुक करतो. या डिझाइनची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि अशा कारचे उत्पादन केले पाहिजे. कदाचित महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये उपस्थित असलेली आमची टीम हा प्रोटोटाइप आणखी विकसित करण्यासाठी बिलालसोबत काम करू शकेल.

Aanand Mahindra
"काय नाना तुम्ही पण..." चित्रा वाघ यांनी शेअर केला नाना पटोलेंचा 'तो' व्हिडिओ

ट्विटरवर त्यांचे ९४ लाख फॉलोअर्स

महिंद्रा यांच्या या ट्विटवर ट्विटर यूजर्सच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत आणि यूजर्स त्याला लाइक करत आहेत.महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन ट्विटरवर सक्रिय आहेत आणि दररोज त्यांच्या पोस्ट आणि फोटोंवर वापरकर्त्याचे मत घेत असतात. विशेष म्हणजे ट्विटरवर त्यांचे ९४ लाख फॉलोअर्स आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com