iPhone 17 : Apple ने नव्या फीचर्ससह लाँच केला आयफोन 17
थोडक्यात
नव्या फीचर्ससह आयफोन 17 लाँच
आतापर्यंतचा सर्वात स्लीम आयफोन 17 एअर लाँच
अॅपलचं 'प्लस' मॉडेल ऐवजी 'एअर' मॉडेल
(iPhone 17) ॲपलने आपल्या नवीन iPhone 17 सीरिजमध्ये खास मॉडेल iPhone 17 Air बाजारात आणले आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचा स्लिम आणि हलका डिझाइन. केवळ 5.6 मिमी जाडीचा हा स्मार्टफोन वापरकर्त्यांना प्रीमियम लुक आणि वेगळा अनुभव देतो. डिझाइनबरोबरच या मॉडेलमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे तो इतर स्मार्टफोन्सपेक्षा वेगळा ठरतो.
या डिव्हाइसमध्ये 6.5-इंच ProMotion डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. यामुळे व्हिडिओ, गेमिंग आणि स्क्रोलिंगचा अनुभव अधिक स्मूद होतो. लॉक स्क्रीनवर रिफ्रेश रेट 1Hz पर्यंत खाली येतो, ज्यामुळे बॅटरीचा वापर कमी होतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Ceramic Shield वापरले गेले आहे, जे पडल्यावर किंवा स्क्रॅचपासून अतिरिक्त सुरक्षितता देते.
प्रोसेसिंग पॉवरसाठी या मॉडेलमध्ये कंपनीने आपला नवीनतम A19 Pro चिप दिला आहे. हा चिप ऑन-डिव्हाइस AI प्रोसेसिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे अॅप्स व गेम्स पूर्वीपेक्षा जास्त वेगाने चालतात. जरी या फोनमध्ये फक्त एकच रियर कॅमेरा आहे, तरीही कंपनीचा दावा आहे की हा कॅमेरा उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ क्वालिटी देऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारात iPhone 17 Air ची किंमत 999 डॉलर्स (सुमारे 88,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. भारतातील किंमती लवकरच जाहीर केल्या जाणार असून प्री-ऑर्डरसाठी हा फोन 12 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. ग्राहकांना हा स्मार्टफोन 19 सप्टेंबरपासून बाजारात मिळू शकेल. हा मॉडेल विशेषतः त्यांच्यासाठी आकर्षक ठरणार आहे, जे स्लिम डिझाइनसह हाय-परफॉर्मन्स डिव्हाइस शोधत आहेत.