Smartphone : सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये सर्वोत्तम स्मार्टफोन पर्याय
आजच्या २१व्या युगात अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल फोन ही सुद्धा एक जीवनावश्यक गरज बनली आहे. आजकाल एखादी लहानातील लहान वस्तू सुद्धा आपल्याला आपल्या मोबाइलफोनमुळे घरबसल्या मिळते. वस्तू घेण्यापासून ते तिकीट बुकिंग, जेवण मागवणे,हॉटेल बुकिंग, गॅस लाईटबील यांचे पेमेंट, घरातील वाणसामान, भाज्या , कपडे या सगळ्या गोष्टी आपल्याला मोबाईलमुळे सहज मिळवता येतात. मोबाईल फोन ही काळाची गरज बनली आहे.
आजकाल आपण नवीन मोबाइल घ्यायचा विचार जरी केला तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना घाम फुटतो. कारण आजकाल मोबाईलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यातल्या त्यात अत्याधुनिक फिचर असलेले आणि महत्वाचे म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसणारे म्हणजे साधारण 15 हजारांच्या रेंजमध्ये कोणते मोबाईल आहेत ते आपण पाहुया.
1. Samsung Galaxy M35 5G
6000mAh ची बॅटरी आणि 5G ची सुविधा असलेला हा सॅमसंगचा अत्याधुनिक मॉडेल आहे. जास्त बॅटरी बॅकअप , कॅमेरा क्वालिटी चांगली असल्यामुळे गेमरसाठी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो.
2. vivo T4x 5G
6000mAh ची बॅटरी,MediaTek चा प्रोसेसर ,स्लिक बॉडी आणि मोठा डिस्प्ले असलेला हा मॉडेल सध्या खूप ट्रेंडिंगही आहे. AI-आधारित कॅमेरा फिचर्स देखील असल्यामुळे हा जास्त लोकप्रिय आहे.
3. Motorola G64 5G
6000mAh पेक्षा मोठी बॅटरी, स्ट्रॉंग बॉडी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला हा मोबाईल क्लीन यूजर इंटरफेससाठी खूप जास्त लोकप्रिय आहे.
4. Realme Narzo 80x 5G
5000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले,MediaTek चा प्रोसेसर, असलेला हा मोबाइलला गेमिंगसाठी उत्तम आहे.
5. Redmi 10 Power
6000mAh ची बॅटरी असलेला, Qualcomm चा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर,आणि HD डिस्प्ले स्ट्रॉंग बिल्ड quality असलेला हा मॉडेल खूप लोकप्रिय आहे.
कोणताही मोबाईल खरेदी करताना त्याची आणि त्यातील असलेल्या फीचर्स ची योग्य पडताळणी करा आणि आपल्या बजेटचा विचार करा. जास्त बॅटरीसह चांगल्या परफॉर्मेंस साठी वरील मोबाईल ब्रँडचा नक्की विचार करा.