Chandrayaan-3 | भारत घडवणार इतिहास! चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर
भारताचं मून मिशन यशस्वी होण्याची शक्यता आहे. भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने आपल्या ऐतिहासिक मिशन चांद्रयान-3 बद्दल नवीन अद्यतने शेअर केली आहे.
भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, विक्रम लँडर आता त्याची उंची आणि वेग कमी करत आहे. चांद्रयान-3 ने रात्री उशिरा म्हणजेच रविवारी (20 ऑगस्ट) पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. लँडिंग साईटवर सूर्योदयाची वाट पाहावी लागणार आहे. सर्व काही सुरळीत राहिलं तर 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरेल. तसे झाल्यास भारत जगात इतिहास निर्माण करेल.
भारताचं मून मिशन चांद्रयान-3 आतापर्यंतच्या प्लानिंग नुसार सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित राहिलं तर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर 5 वाजून 47 मिनिटांनी लँड करेल. रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश बनेल.