WhatsApp community
WhatsApp communityTeam Lokshahi

WhatsApp Community वर असा करा नवीन ग्रुप तयार

WhatsAppने नेहमीच वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यामुळे वापरकर्त्यांना अनेक फायदेही होतात. अलीकडेच WhatsApp कंपनीने वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर्स आणले होते.

WhatsAppने नेहमीच वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यामुळे वापरकर्त्यांना अनेक फायदेही होतात. अलीकडेच WhatsApp कंपनीने वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर्स आणले होते. हे फिचर्स कम्युनिटी फिचर्सच्या नावाने ते सुरू करण्यात आले आहे. 

'कम्युनिटी फीचर' द्वारे वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप एकत्र जोडू शकतात. या फिचर्सच्या मदतीने, वापरकर्ते सब ग्रुप्स असा पर्याय तयार करू शकतील. तुम्ही WhatsAppवर एकत्र 50 गट जोडू शकता. त्याचा तुम्हाला जास्त तर फायदा होऊ शकतो. आणि हे फीचर्स वापरण्यासाठीही सोपे आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स असा तयार करा

अँड्रॉईड किंवा आयओएस डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअॅप असणे गरजेचे आहे.

व्हॉट्सअॅप सुरू केल्यानंतर तुम्हाला New Chat च्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला येथे Group आणि New Community चा पर्याय पाहायला मिळेल.

तुम्ही त्यानंतर New Community पर्यायावर क्लिक करून Get Started पर्यायावर क्लिक करा.

WhatsApp community
OnePlus कंपनी घेऊन आलीयं बजेटमधील स्मार्टफोन

त्यानंतर तुम्ही ग्रुपचे नाव आणि प्रोफाइल फोटो लावू शकता. त्यानंतर तुम्ही Next पर्यायावर क्लिक करून येथे तुम्ही आधीच तयार केलेले ग्रुप दिसतील आणि ते ग्रुप त्या ग्रुपमध्ये जोडू शकता.

तसेच तुम्ही नवीन ग्रुपही तयार करू शकता.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com