Elon Musk: नव्या रंगात आणि नव्या लोगोसह Twitter येणार यूजर्सच्या भेटीला

Elon Musk: नव्या रंगात आणि नव्या लोगोसह Twitter येणार यूजर्सच्या भेटीला

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. या बदलांमुळे त्यांच्यावर टीका केली जाते. ट्विटर विकत घेतल्यापासून त्याने त्यात अनेक बदल केले. आता पुन्हा एकदा ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलणार असून त्यासोबत त्याचा निळा रंगही बदलण्यात येणार आहे.

इलॉन मस्कने रविवारी सकाळी 9.30 वाजता हे ट्विट केले आहे. मस्क देखील X या शब्दाने ट्विटर बर्ड लोगो बदलण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.इलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये X या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरचा नवा रंग आणि नवा लोगो कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळूहळू सर्व पक्ष्यांना हटवू असं ट्विट इलॉन मस्कने केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com