एलोन मस्क
एलोन मस्क टिम लोकशाही

Elon Musk : एलॉन मस्क पुन्हा एकदा बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्या किती वाढली संपत्ती

एलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

एलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टचा पराभव करून त्याने हे स्थान मिळवले आहे. ट्विटर डील आणि टेस्ला शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे एलोन मस्कची नेट वर्थ लक्षणीयरीत्या खाली आली होती. आता त्याने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे.

मस्कच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आता इलॉन मस्कची संपत्ती १८७ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, सध्या एलोन मस्कची संपत्ती $187 अब्ज झाली आहे. तर बर्नार्ड अर्नॉल्ट 185 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com