ट्विटरवरून हटणार प्रत्येकाची 'ब्लू टिक', एलॉन मस्कची मोठी घोषणा

ट्विटरवरून हटणार प्रत्येकाची 'ब्लू टिक', एलॉन मस्कची मोठी घोषणा

कंपनीचे नवे बॉस एलॉन मस्क यांनी याबाबत घोषणा केली आहे. याचे कारणही त्यांनी दिले आहे.

नवी दिल्ली : ट्विटरवरून आता प्रत्येकाची ब्लू टिक काढली जाणार आहे. कंपनीचे नवे बॉस एलॉन मस्क यांनी याबाबत घोषणा केली आहे. याचे कारणही त्यांनी दिले आहे. वापरकर्त्यांना आता सदस्यता शुल्क भरूनच ट्विटर ब्लू टिक मिळणार आहे. यासाठी महिन्याला 8 डॉलर खर्च करावे लागणार आहेत.

ट्विटरवरून हटणार प्रत्येकाची 'ब्लू टिक', एलॉन मस्कची मोठी घोषणा
एलॉन मस्कने ट्विटरचा अपडेटेड अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग्राम केला लॉन्च , आता 3 रंगात असतील टिक्स

ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाऊंट्सना यापूर्वी ब्लू टिक दिली जात होती. पण, आता कंपनी ब्लू टिक सब्सक्रिप्शनद्वारे देत आहे. याशिवाय सोनेरी आणि राखाडी रंगाची टिक्सही दिली जात आहेत. कंपन्यांच्या ऑफिशिअल खात्यांना सोनेरी रंगाची टिक दिली जात आहे. पण, ट्विटर बॉस इलॉन मस्कची नवी घोषणा केली आहे.

एलॉन मस्क यांनी म्हंटले की, काही लोकांना चुकीच्या पद्धतीने ब्लू टिक देण्यात आली होती. सध्या 4 लाखांहून अधिक ट्विटर खात्यांवर ब्लू टिक आहे. हे नवीन सबस्क्रिप्शन सेवेसह व्यक्तींना सामाजिक स्थितीपासून वेगळे ब्लू टिक्स दिले जातील. त्यासाठी पैसे दिल्यास त्यांना ब्लू टिक दिली जाईल. काही काळापूर्वी कंपनीने हे फीचर जारी केले होते. परंतु, अनेक चुकीच्या खात्यांना देखील ब्लू टिक मिळाल्याच्या खोट्या बातम्या पसरवण्यास सुरुवात झाली. याचा मोठा तोटा कंपनीला सहन करावा लागला.

ट्विटरवरून हटणार प्रत्येकाची 'ब्लू टिक', एलॉन मस्कची मोठी घोषणा
Twitter Blue Tick : ट्विटर पुन्हा ब्लू टिक सब्सक्रिप्शन करत आहे सुरू, आता यूजर्सला मोजावे लागतील इतके पैसे

दरम्यान, कंपनीने ट्विटर ब्लूसाठी प्रति महिना $8 शुल्क ठेवले आहे. तथापि, अॅपल वापरकर्त्यांसाठी हे शुल्क प्रति महिना $ 11 आहे. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन शुल्क भारतात जाहीर करण्यात आलेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com