युपीआय मनी ट्रान्सफर, ऑफलाईन-ऑनलाईन पेमेंटची सुविधा मिळणार मोफत
भारतातील अग्रगण्य डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोन पेने युपीआय मनी ट्रान्सफर, ऑफलाईन, ऑनलाईन पेमेंटसाठी आकारल्या जाणार्या प्रक्रिया शुल्काबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फोन पेने मंगळवारी स्पष्ट केले की, त्यांच्या पेमेंट अॅपवरील सर्व युपीआय मनी ट्रान्सफर, ऑफलाईन आणि ऑनलाईन पेमेंट सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य आहेत आणि ते सुरू राहतील.
कंपनीने सांगितले की, फोन पे या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही आणि भविष्यातही असे करणार नाही. तसेच फोन पे मोबाईल रिचार्जसाठी ट्रायल करीत आहे. जिथे वापरकर्त्यांच्या छोट्या ग्रुपकडून 51-100 रुपयांच्या रिचार्जसाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जसाठी 2 रुपये प्रक्रिया शुल्क घेतले जात आहे.हे शुल्क सर्व पेमेंट स्रोत (युपीआय, वॉलेट, क्रेडिट आणि डेबिट कार्ड) वापरकर्त्यांसाठी लागू आहे. एवढंच नाही तर 50 रुपयांपेक्षा कमीचे रिचार्ज पूर्णपणे मोफत आहे.