Google Fined: गुगलवर आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई, आता 936 कोटींचा दंड
Team Lokshahi

Google Fined: गुगलवर आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई, आता 936 कोटींचा दंड

यूएस कंपनी Google ला सुमारे 936 कोटी रुपये ($113.04 दशलक्ष) दंड ठोठावण्यात आला आहे.

यूएस कंपनी Google ला सुमारे 936 कोटी रुपये ($113.04 दशलक्ष) दंड ठोठावण्यात आला आहे. या आठवड्यातील ही कंपनीवरील दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे. मागील आठवड्यात गुगलला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने सुमारे 1,338 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. स्पर्धेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल डिव्हाईस स्पेसमध्ये आपल्या मजबूत स्थानाचा गैरवापर केल्याचा Google वर आरोप आहे.

भारतीय स्पर्धा आयोगाचे (CCI) अध्यक्ष अशोक कुमार गुप्ता म्हणाले की, दंड आकारण्यात नियामक व्यावहारिक आहे. CCI च्या कृती व्यवसाय आणि आर्थिक वास्तवापासून विचलित होत नाहीत. चार वर्षे रेग्युलेटरच्या प्रमुखपदी राहिल्यानंतर अशोक कुमार गुप्ता आज पायउतार होत आहेत.

ते पुढे म्हणाले की डिजिटल बाजारांचे प्रभावीपणे नियमन करण्यासाठी फ्रेमवर्कच्या व्यवहार्यतेचा विचार केला पाहिजे. गुरुवारी अँड्रॉइडच्या मुद्द्यावर गुगलच्या टिप्पण्यांबद्दल विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गेल्या बुधवारी, आयोगाने मेकमायट्रिप, गोइबीबो आणि ओयो यांना अनुचित व्यवसाय पद्धतींसाठी एकूण 392 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

मोबाइल अॅप चालविण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम (OS) आवश्यक आहे. Google Android OS चालवते आणि व्यवस्थापित करते आणि इतर अनुप्रयोगांसाठी परवाने जारी करते. ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) हे OS आणि Google चे अॅप त्यांच्या मोबाईलमध्ये वापरतात. त्यांचे अधिकार नियंत्रित करण्यासाठी ते मोबाईल ऍप्लिकेशन वितरण करार (MADA) सह अनेक करार करतात. Google ने या करारांचे उल्लंघन केले आहे असे CCA चे मत आहे.

Google Fined: गुगलवर आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई, आता 936 कोटींचा दंड
पावरफुल प्रोसेसरसह OnePlus Nord N300 स्मार्टफोन लॉन्च
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com