Google Meet Launches Emoji Reactions Feature
Google Meet Launches Emoji Reactions Feature

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे गुगल मीटवरही इमोजी वापरता येणार, जाणून घ्या कसं वापरायचं ?

आजकाल सोशल मीडिया न वापरणारा माणूस शोधून सापडणार नाही. सोशल मिडिया वापरून त्यावर आपली मते मांडणे आपल्याला नवीन नाही

आजकाल सोशल मीडिया न वापरणारा माणूस शोधून सापडणार नाही. सोशल मिडिया वापरून त्यावर आपली मते मांडणे आपल्याला नवीन नाही. यामध्ये सोशल मीडियावर इमोजी मधून व्यक्त होणंही आपल्या सगळयांना माहित आहेच. पण याच इमोजी आता गुगल मीट मध्येही वापरता येणार आहेत.

Google Meet Launches Emoji Reactions Feature
Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द होणार का? आज हायकोर्टात सुनावणी

लॉकडाऊनच्या काळात गुगल मीटचा सर्वाधिक वापर झाला. लॉकडाउनमुळे घरातुन काम करताना ऑफिसच्या मिटिंग, विद्यार्थ्यांचे क्लास ऑनलाईन गुगल मीटवर होत होते. लॉकडाउन संपला असला तरी आतासवयीनुसार ऑनलाईन मिटिंगची सवय तशीच राहिली आहे. आजही अनेक वेळा मिटिंगसाठी ऑनलाईनचं प्रमाण मोठं आहे. ऑनलाईन मिटिंग घेणाऱ्या अशा सर्वांसाठी गुगल मीटने एक भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरचा वापर करून आता गुगल मीटमध्येही इमोजी शेअर करता येणार आहे.

गुगल मीटवर मिटिंग सुरू असताना, त्यामध्ये इमोजी शेअर करता येणार आहे. टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार गुगल मीटवर डाव्या बाजूला या इमोजी रीऍक्शन्स दिसतील. या इमोजी कोणी शेअर केल्या आहेत हे देखील युजर्सना जाणून घेता येणार आहे.याशिवाय गुगलकडून मीटवर वर्कस्पेस अपडेट देखील आणणार. त्यामुळे लोकांना सहजपणे पर्सनल किंवा ग्रुप चॅट करता येणार आहे. याआधी गुगल चॅटवर "क्रिएट ग्रुप चॅट" असा ऑप्शन होता. त्याऐवजी आता युजर्सना ग्रुप चॅट सुरू करण्यासाठी फक्त एकापेक्षा जास्त नावे टाइप करून ग्रुप क्रिएट करता येणार आहे किंवा एक नाव टाइप करून, पर्सनल चॅट सुरू करता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com