गुगल मिटला मिळाले नवे अपडेट, आता मिटिंग होस्टला करता येणार ‘हे’ बदल

गुगल मिटला मिळाले नवे अपडेट, आता मिटिंग होस्टला करता येणार ‘हे’ बदल

Published by :
Published on

गुगल मिटकडून नवे फिचर अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार मिटिंग होस्टला अधिक उत्तम पद्धतीने कंट्रोल करता येणार आहे. यापूर्वी गुगल मिटच्या सर्व युजर्सला माईक आणि कॅमेऱ्याचे कंट्रोल दिले जात होते. त्यामुळे मीटिंगमध्ये काही वेळेस अडथळे सुद्धा येत होते.

याच कारणास्तव कंपनीकडून होस्टला कॅमेरा आणि मायक्रोफोन ऑफ करण्याचे ऑप्शन दिले गेले आहे. म्हणजेच मीटिंगदरम्यान होस्ट सर्व युजर्सचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन ऑफ करु शकतो. गुगल सारखे फिचर हे आधीपासूनच मायक्रोसॉफ्टकडून त्यांच्या मायक्रोसॉफ्ट टीमसाठी दिले जात आहे. याच आधारावर गुगलकडून त्यांच्या Education Fundamentals आणि Education Plus च्या सर्व वर्कस्पेसच्या मीटिंग होस्टला अधिक कंट्रोल दिले जाणार आहेत.

त्याचसोबत अन्य गुगल वर्कस्पेसमध्ये येणाऱ्या दिवसात या फिचरचे अपडेट मिळणार आहे. मीटिंग होस्टजवळ युजर्सचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन ऑफ करण्याचा अधिकार असणार आहे. दरम्यान, युजर्सला गरज असेल ते स्वत:ला Unmute करु शकतो. हे फिचर खासकरुन डेस्कटॉप ब्राउजरला मिळणार आहे. मात्र लवकरच iOS आणि अ‍ॅन्ड्रॉइड युजर्सला ही दिले जाऊ शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com