Instagram Bug शोधणाऱ्या मयूर फरतडेला मिळाले 22 लाखांचे बक्षीस

Instagram Bug शोधणाऱ्या मयूर फरतडेला मिळाले 22 लाखांचे बक्षीस

Facebook ने Instagram मधील एक बग शोधण्यासाठी भारतीय डेवेलपर मयूर फरतडेला 30,000 डॉलरचे बक्षीस दिले आहे. भारतीय चालनानुसार ही रक्कम 22 लाखांच्या आसपास आहे. या बगचा वापर करून कोणीही इंस्टाग्राम युजरचे खाजगी फोटो त्यांना फॉलो न करता देखील बघू शकत होता. माहिती मिळाल्यानंतर फेसबुकने ही चूक सुधारली आहे.

मयूरने एक ब्लॉग पोस्ट करून याची माहिती दिली आहे. त्याने या बग संबंधित सविस्तर माहिती देखील या ब्लॉग पोस्टमधून दिली आहे. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती.

मयूरने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडीओज देखील बघता येत होते. त्याचबरोबर या पोस्टवरील लाईक्स, कमेंट्स, सेव्ह काउन्ट इतर माहिती देखील बघता येत होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com