इंस्टाग्राम डाउन! 1 लाख 80 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी केल्या तक्रारी
Admin

इंस्टाग्राम डाउन! 1 लाख 80 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी केल्या तक्रारी

इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रविवारी डाऊन झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रविवारी डाऊन झाला. ज्यामुळे 1 लाख 80 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी तक्रारी केल्या. मेटा प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामनुसार, कंपनीला रविवारी (21 मे) काही लोकांना अॅप ऍक्सेस करण्यात समस्या येत असल्याचे समजले, त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी तक्रारी केल्या.

यूएसमध्ये 1 लाखांहून अधिक, कॅनडात 24 हजार आणि यूकेमध्ये 56 हजार लोकांनी याबद्दल माहिती दिली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने ई-मेलद्वारे आउटेजबद्दल सांगितले की आम्ही शक्य तितक्या काम करत आहोत आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

या आउटेजमागील कारण तांत्रिक समस्या असू शकते, ज्यामुळे लोकांना अॅपमध्ये प्रवेश करण्यात अडचण आली होती, तरीही आम्ही समस्येचे निराकरण करण्यासाठी सतत काम करत आहोत. Instagram रविवारी सुमारे 1745 ET पासून वापरकर्त्यांसाठी बंद होते. एक लाख 80 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी या समस्येबद्दल तक्रार केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com