iQoo 11 5G
iQoo 11 5G Team Lokshahi

iQoo 11 5G स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च

१० जानेवारीला म्हणजेच उद्या iQoo ही मोबाईल कंपनी आपला iQoo 11 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे.

१० जानेवारीला म्हणजेच उद्या iQoo ही मोबाईल कंपनी आपला iQoo 11 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. iQoo ही VIVOची सहयोगी कंपनी आहे. हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याआधीच या कंपनीने त्यामधील फीचर्सबद्दल काही माहिती वापरकर्त्यांना सांगितली आहेत. iQoo 11 5G स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत ५५,००० रुपये ते ६०,००० रुपये इतकी असणार असल्याची माहिती कंपनीने आधीच दिली आहे.

iQoo 11 5G
नंबर न सेव्ह करता पाठवू शकता मेसेज; करा 'या' स्टेप फॉलो

iQoo 11 5G या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमधील कॅमेरा हा ५० एमपी सॅमसंग जीएन ५ या सेन्सरसह १३ मेगापिक्सल पोर्टेट सेन्सर आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच iQoo 11 5G या स्मार्टफोनमध्ये ५,००० mAh इतकी बॅटरीची क्षमता असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com