Jio News : जिओने लॉन्च केला नवा WiFi 6 राऊटर; वेगवान इंटरनेटसाठी परवडणारा पर्याय

Jio News : जिओने लॉन्च केला नवा WiFi 6 राऊटर; वेगवान इंटरनेटसाठी परवडणारा पर्याय

रिलायन्स जिओने भारतात एक नवा आणि आधुनिक WiFi 6 राऊटर सादर केला आहे. मोठ्या घरातील, अनेक उपकरणे वापरणाऱ्या आणि स्मार्ट होम युजर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

रिलायन्स जिओने भारतात एक नवा आणि आधुनिक WiFi 6 राऊटर सादर केला आहे. Jio AX6000 Universal Router नावाचा हा ड्युअल-बँड राऊटर प्रामुख्याने मोठ्या घरातील, अनेक उपकरणे वापरणाऱ्या आणि स्मार्ट होम युजर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे. ₹5,999 या किफायतशीर दरात उपलब्ध असलेल्या या राऊटरमुळे आता घरबसल्या अधिक वेगवान आणि स्थिर इंटरनेटचा अनुभव घेता येणार आहे.

हा राऊटर एकाच वेळी 2.4GHz आणि 5GHz बँडवर काम करतो. यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये स्विच करण्याची गरज भासत नाही. 5GHz बँडवर 4,800Mbps आणि 2.4GHz बँडवर 1,200Mbps पर्यंतचा वेग मिळतो. त्यामुळे एकत्रितपणे 6,000Mbps चा थिअरेटिकल स्पीड यामधून अनुभवता येतो. WiFi 6 तंत्रज्ञानामुळे, याला अधिक श्रेणी, उत्तम नेटवर्क स्थिरता आणि कमी विलंब (latency) लाभतो.

यामुळे एकाच वेळी अनेक उपकरणे वापरत असताना देखील नेट स्लो होण्याची शक्यता कमी असते. विशेष म्हणजे, यामध्ये Jio True AI Mesh टेक्नॉलॉजी दिली असून यामुळे अनेक AX6000 राऊटर एकत्र जोडून मोठ्या जागेत अखंड वायफाय नेटवर्क तयार करता येतो. या राऊटरमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आला असून, त्याचा परफॉर्मन्स अधिक सुरळीत असल्याचे जिओचे म्हणणे आहे. LAN पोर्ट्स पारंपरिक पोर्ट्सपेक्षा चारपट वेगवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे, जे गेमिंग व स्ट्रीमिंगसाठी फायदेशीर ठरते.

संपूर्णपणे Ethernet आधारित असलेला हा राऊटर कोणत्याही ब्रॉडबँड, फायबर किंवा DSL कनेक्शनसोबत काम करू शकतो. मात्र, हे IP over DHCP सेटअपसाठीच उपयुक्त आहे; IPPOE किंवा PPOE सपोर्ट यात नाही. याचे सेटअप अतिशय सोपे असून Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध असलेल्या JioHome अ‍ॅप द्वारे काही स्टेप्समध्ये हे राऊटर सुरू करता येते.

2,000 स्क्वेअर फूटपर्यंत कव्हरेज देणारा AX6000 हे 4K स्ट्रीमिंग, क्लाउड गेमिंग व स्मार्ट डिव्हाइसेसच्या कनेक्टिव्हिटीसाठी आदर्श पर्याय आहे. यामध्ये एकाच वेळी 100 हून अधिक डिव्हाइसेस सहजपणे कनेक्ट होऊ शकतात. सध्या हा राऊटर जिओच्या अधिकृत वेबसाइटवर व इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असून, ग्राहकांना 1 वर्षाची राऊटर वॉरंटी आणि 6 महिन्यांची अ‍ॅडॉप्टर वॉरंटी मिळते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com