लांब मेसेज टाइपिंगला निरोप ! Whatsappवर आता हँड्सफ्री ग्रुप व्हॉइस चॅट

लांब मेसेज टाइपिंगला निरोप ! Whatsappवर आता हँड्सफ्री ग्रुप व्हॉइस चॅट

संभाषण आणखी सोपी आणि मजेदार बनवेल.
Published by :
Shamal Sawant
Published on

जगभरात 3.5 अब्जाहून अधिक वापरकर्ते असलेले सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप, व्हॉट्सॲपने आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी एक नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे. आता ग्रुप चॅटमध्ये टाइप करण्याचा त्रास कमी झाला आहे. व्हॉट्सॲपने ग्रुप व्हॉइस चॅट नावाचे एक नवीन टूल लाँच केले आहे. ज्यामुळे संभाषण आणखी सोपी आणि मजेदार बनणार आहे.

नवीन फीचर :

व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे ग्रुपमध्ये लांब मेसेज टाइप करणे टाळू इच्छितात. आता तुम्ही ग्रुप चॅटमध्ये थेट तुमच्या स्वतःच्या आवाजाने, हँड्सफ्री आणि रिअल-टाइममध्ये बोलू शकता. म्हणजेच कॉल न करता, थेट ग्रुपमध्ये थेट व्हॉइस चॅट सुरू करता येते जणू काही समोरासमोर संभाषण सुरू आहे. तुमच्या ग्रुपमध्ये 3-4 लोक असतील किंवा 100 पेक्षा जास्त सदस्य असतील तरीही आता सर्व वापरकर्ते या व्हॉइस चॅटचा लाभ घेऊ शकतात.

Android आणि iOS साठी रोलआउट :

हे वैशिष्ट्य हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. जर हे अपडेट तुमच्या फोनवर अजून आले नसेल तर थोडी वाट पहा. लवकरच ते तुमच्या डिव्हाइसवरही उपलब्ध होईल. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल.

फीचर व्हॉइस नोट्सपेक्षा वेगळे :

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे नवीन वैशिष्ट्य पारंपारिक व्हॉइस नोट्सपेक्षा वेगळे आहे. व्हॉइस नोट्स हे एकतर्फी मेसेज असले तरी व्हॉइस चॅट कॉल बटण दाबल्याशिवाय थेट ग्रुप संभाषण सुरू करून लाईव्ह ग्रुप कॉलिंग करता येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com