meta whatsapp
meta whatsappteam lokshahi

व्हॉट्सअॅपमध्ये मोठा बदल, ग्रुप अॅडमिनला असणार हे अधिकार

ग्रुप अॅडमिनला हा अधिकार मिळेल
Published by  :
Team Lokshahi

meta whatsapp : इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या तुलनेत आता व्हॉट्सअॅपमध्ये युजर्ससाठी अनेक बदल केले जात आहेत. मेटाने यापूर्वी अॅपमध्ये अनेक अपडेट्स आणण्याबाबत बोलले होते. ज्या अंतर्गत व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. त्याचबरोबर आता हे अॅप ग्रुप अॅडमिनला एक महत्त्वाचा अधिकार देणार आहे. (meta whatsapp will soon make a big change will give new power to admin)

मेटा चे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला इतरांपेक्षा चांगले काम करायचे आहे. कंपनीने युजर्ससाठी नवीन अपडेट्स आणले आहेत. यापूर्वी अॅपच्या वैशिष्ट्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, नवीन फीचर आल्यानंतर सोशल मीडिया ग्रुप्समध्ये सुधारणा केली जाऊ शकते. सध्या, अॅपच्या नवीनतम अपडेटची सध्या बीटा चाचणी सुरू आहे. फक्त बीटा टेस्टर्सना यात प्रवेश देण्यात आला आहे.

meta whatsapp
Breast Cancer : महिलांमध्ये कर्करोगाची प्रकरणे झपाट्याने वाढतायत, अशी घ्या काळजी

ग्रुप अॅडमिनला हा अधिकार मिळेल

नवीन मेटा बदलामुळे आता व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा जास्त फीचर्स मिळणार आहेत. यासोबतच ग्रूम अॅडमिनलाही अधिक अधिकार दिले जातील. एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या आगामी फीचर अपडेटनंतर ग्रुप अॅडमिन प्रत्येकासाठी ग्रुपमधील कोणाचेही मेसेज डिलीट करू शकतात.

संदेश हटवल्यानंतर प्रतिसाद दर्शविला जाईल

जर ग्रुप अॅडमिनने मेसेज डिलीट केला तर तो ग्रुपच्या इतर सदस्यांना कळेल. मेसेज डिलीट केल्यानंतर, ग्रुपशी कनेक्ट केलेल्या युजर्सना हे दिसेल की हे अॅडमिनने डिलीट केले आहे.

meta whatsapp
Money9 : घर खरेदी करताय किंवा भेट देताय? त्या आधी ही माहिती वाचा

मनमानी संपेल

व्हॉट्सअॅपमधील नव्या बदलांनंतर आता ग्रुपमधील सदस्यांची मनमानी संपणार आहे. यामुळे अॅडमिनला एक सुपर पॉवर मिळेल. जेणेकरून तो कोणताही चुकीचा संदेश सहजपणे डिलीट करू शकेल.

WABetaInfo अहवाल

व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर अपडेट फीचर्सवर नजर ठेवणारी साइट WABetaInfo च्या ताज्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप ग्रुपमधून मेसेज डिलीट केल्यानंतर सदस्यांना समजेल की अॅडमिनने मेसेज डिलीट केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com